विष्णू वाघांना डिस्चार्ज

0
84

सांत आंद्रेचे आमदार तथा उपसभापती विष्णू वाघ यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून उपचारानंतर काल आठवड्यानंतर घरी पाठवण्यात आले.

आठ दिवसांपूर्वी अनिल होबळे यांच्या सत्कार सोहळ्याच्यावेळी श्री. वाघ यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर त्यांना तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे काल त्यांना घरी पाठवण्यात आले.