‘विवो’शी असलेला करार मोडला

0
152

>> बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने चिनी मोबाईल कंपनी ‘विवो’शी असलेला इंडियन प्रीमियर लीगसाठीच्या मुख्य प्रायोजकाचा पाच वर्षांचा करार अखेर मोडला. भारत- चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. असे असले केवळ एका वर्षासाठी हा करार मोडला गेला असल्याचे समजते.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि विवो कंपनीदरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेअंती एक वर्षासाठी विवो कंपनी आयपीएलचे प्रायोजक बनणार नाही हे ठरवण्यात आले. या निर्णयामुळे बीसीसीआयला यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी आता नवीन प्रायोजक शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

देशात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा युएईत जैव-सुरक्षित वातावरणात घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी केवळ केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणार आहे.
हल्लीच लडाखमधील गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यामुळे बीसीसीआयने विवो सोबत असलेला करार रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. बीसीसीआयने मात्र करार रद्द न करता विवोलाच मुख्य प्रायोजक म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु चीनविरोधी वाढता विरोध पाहता विवो कंपनीने या प्रायोजकत्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अखेर बीसीसीआयलाच विवोशी असलेला करार मोडत असल्याचे जाहीर करावे लागले.

बीसीसीआय आणि विवो कंपनीमध्ये २०१८ला ५ वर्षांचा करार झाला होता. या स्पर्धेच्या प्रायोजकासाठी विवोने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला विवो कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. परंतु दोन वर्षानंतर हा कारार मोडला गेला आहे. मात्र, भारत – चीन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहिरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी विवोसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेत