न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर कॅनडा एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरील एका वाहनाला धडकल्याचा प्रकार समोर आला आहे. लागार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत वैमानिक आणि सहवैमानिक ठार झाले. या घटनेनंतर विमानतळावर येणारी विमाने इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत, असे वृत्त एनबीसीच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे विमान मॉन्ट्रियलहून आलेले हे विमान ताशी सुमारे 24 मैल (39 किमी) वेगाने त्या वाहनाला धडकले. हे विमान एअर कॅनडाची प्रादेशिक भागीदार असलेल्या जॅझ एव्हिएशन या कंपनीचे आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने सर्व विमाने उड्डाणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.