Home बातम्या जमीन रुपांतर प्रकरणीसूचना, आक्षेप मागवले

जमीन रुपांतर प्रकरणीसूचना, आक्षेप मागवले

0

राज्य सरकारच्या नगरनियोजन खात्याने टीसीपी कलम 39 अ अंतर्गत सुमारे 99,525 चौरस मीटर जमिनीच्या रूपांतराबाबत नागरिकांना 30 दिवसांच्या आत सूचना, आक्षेप सादर करण्याचे आवाहन केले आहे. नगरनियोजन खात्याने टीसीपी कायद्याच्या कलम 39 अ च्या तरतुदींनुसार सुमारे 99,525 चौरस मीटर जमिनीच्या रुपांतराचे प्रस्ताव स्वीकारले आहेत. कांदोळी, हळदोणा कारापूर, मार्ना, जुआ-तिसवाडी, पिळर्ण, मावळींगे, मेणकुरे, खोर्ली, बोर्डे-डिचोली आणि सुकूर या गावांमधील जमीन रुपांतराचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत. तसेच, नगरनियोजन खात्याने अन्य एका नोटीसद्वारे टीसीपी कलम 39 अ च्या तरतुदींनुसार, मांद्रे आणि साल्वादोर-दो-मुंद येथील 4.98 लाख चौ.मी. जमीन रूपांतराचा प्रस्ताव स्वीकारला आहे. तसेच, मोरजी येथील 32,376 चौ. मी. जमीन खेळाच्या मैदानात रूपांतरित करण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली आहे.