Home Featured विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

0

महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केले असून बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आले असून काल विनोद तावडे यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.