राजस्थानात १५ मंत्री शपथबद्ध

0
15

राजस्थानमधील सत्ताधारी कॉंग्रेसच्या १५ आमदारांनी काल रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल कलराज मिश्र यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यापैकी ११ आमदारांनी कॅबिनेट तर ४ आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह राज्यातील अशोक गहलोत मंत्रिमंड ळातील फेरबदल पूर्ण झाले.

राज्यातील कॉंग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत आहे आणि मंत्रिमंडळातील हा पहिला फेरबदल आहे. कॉंग्रेस हायकमांडने या फेरबदलात माजी उपप्रमुख सचिन पायलट यांच्या गटाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवीन मंत्र्यांमध्ये ममता भूपेश, भजनलाल जाटव आणि टिकाराम जुली यांना राज्यमंत्रीपदावरून बढती देण्यात आली आहे.

कॉंग्रेसमधूनच विरोध
टिकाराम जुली यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. पण टिकाराम जुली यांना कॉंग्रेसमधूनच विरोध होत आहे. टिकाराम जुली भ्रष्ट नेते आहेत, यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आपण कॉंग्रेस हायकमांडकडे केली होती. पण त्यांना मंत्रिपद दिले गेले. याला आपला विरोध आहे, असे कॉंग्रेस आमदार जौहरी लाल मीणा यांनी सांगितले असून टिकाराम यांनी आरोप फेटाळले आहेत.