Home बातम्या विनापरवाना बंदुक बाळगल्याप्रकरणी अटक

विनापरवाना बंदुक बाळगल्याप्रकरणी अटक

0

सांगे येथे विनापरवाना बंदुकीसहीत एकास अटक करण्यात आली तर धडे सांगे येथे दुसर्‍या घटनेत एक विनापरवाना बंदुक सांपडण्याची घटना घडली.

भाटी सांगे येथे भिसो उपासो गांवकर यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून भारतीय बनावटीची १२ बोअर बंदुक व १३ काडतूसे जप्त केली. विनापरवाना बंदुक ठेवल्याप्रकरणी भिसो गांवकर याला अटक करण्यात आली.

वन खात्याचे अधिकारी माशेलकर यांनी गेल्या ८ जून रोजी धडे सांगे येथे बेवारशीस्थितीत पडलेली सिंगल बोअर बंदुक सापडली. अज्ञातावर गुन्ह्याची नोंद केली आहे.