विधानसभा निवडणुकीत मगो २४ जागा लढवणार ः सुदिन

0
35

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष २४ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचे मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यापैकी १२ मतदारसंघांतील उमेदवार यापूर्वीच निश्‍चित झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मात्र, त्या उमेदवारांना सोबत घेऊन पक्ष राज्यभर रथयात्रा काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

उर्वरित १२ मतदारसंघांतील उमेदवारही लवकरच निश्‍चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले. हे काम दिवाळीनंतर होणार असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.

पक्षाने १२ मतदारसंघांत यापूर्वीच काम सुरू केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ह्या १९ मतदारसंघांतील उमेदवारही निश्‍चित झाले असल्याचे ते म्हणाले.
सर्व उमेदवारांची नावे जाहीर करून सर्व तालुक्यांत ४ नोव्हेंबरनंतर रथयात्रा काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.