विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वेध

0
96

>> तयारी पूर्ण; भाजपसह कॉंग्रेसचा बहुमताचा दावा

 

येत्या शनिवारी होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून प्रमुख राजकीय पक्षांबरोबर त्यांचे समर्थक व राज्यातील तमाम लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. उत्तर गोव्यातील १९ मतदारसंघांची मतमोजणी पणजी येथील बाल भवनच्या मुख्य इमारतीत होईल तर दक्षिण गोव्यातील बोर्डा येथील शासकीय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात होणार आहे. दरम्यान, निकालाला अवघेच तास शिल्लक राहिले असल्याने सत्ताधारी भाजप, तसेच कॉंग्रेस व मगो या प्रमुख पक्षांनी सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काल भाजप व कॉंग्रेसने उमेदवारांच्या बैठका घेतल्यानंतर आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला.

मतमोजणीसाठी नेमणूक केलेल्या कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी कामासाठी दक्षिण गोव्यात दोन हजार कर्मचारी व पोलिसांची नेमणूक केली आहे. दक्षिण गोव्यात दि. ११ रोजी कोणतेही अनुचित व हिंसक प्रकार टाळण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. तसेच त्या परिसरांतील हॉटेल, रेस्टॉरंट, चहाची दुकाने, धाबे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी सांगितले.
मतमोजणी तीन टप्प्यांत
दक्षिण गोव्यातील २१ मतदारसंघांची मतमोजणी तीन टप्प्यांत होईल. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम प्रियोळ, शिरोडा, मुरगाव, दाबोळी, नुवे, फातोर्डा, बाणावली, कुंकळ्ळी, केपे, सावर्डे तिसर्‍या मजल्यावर होणार आहे.
दुसर्‍या फेरीत फोंडा, मडकई (पहिला मजला), वास्को, कुंकळ्ळी, कुडतरी (दुसरा मजला), मडगाव, नावेली, वेळ्ळी, कुडचडे, सांगे (तिसरा मजल्यावर) होणार आहेत. तिसर्‍या फेरीत काणकोण मतदारसंघाची मोजणी दुसर्‍या मजल्यावर होणार आहे. प्रत्येक केंद्रात दहा टेबलांवर मतमोजणी
होईल.
मतदान यंत्रे उघडण्यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांची टपाली मते मोजण्यात येतील, असे जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यात आतापर्यंत ९ हजार कर्मचार्‍यांपैकी ७६३९ जणांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.
वाहतूक व्यवस्थेत बदल
बोर्डा सर्वे ऑफीस ते आगाळी जंक्शनपर्यंत वाहने पार्कींगला बंदी घालण्यात आली आहे. सरकारी वाहने कॉलेजच्या खुल्या मैदानात पार्कींग केली जाणार आहेत. उमेदवारांचे समर्थक, लोकांनी वाहने पूर्वोत्तर बगल रस्त्यावर पार्क करावयाची आहेत. बोर्डा येथून एवरिक सिल्वा यांच्या घराजवळून आगाळी चार रस्ता जंक्शनपर्यंत रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येईल. या मार्गावरील वाहतूक रवींद्र भवनाजवळून फातोर्डा, आर्लेम, रस्त्यावरून वळविण्यात येईल.

अशी होईल मतमोजणी
उत्तर गोवा
* पहिली फेरी : मांद्रे, डिचोली, म्हापसा, शिवोली, कळंगुट, हळदोणे, ताळगाव, सांत आंद्रे, मये व पर्ये.
* दुसरी फेरी : पेडणे, थिवी, साळगाव, पर्वरी, पणजी, सांताक्रुझ, कुंभारजुवे, साखळी व वाळपई.
दक्षिण गोवा
* पहिली फेरी : प्रियोळ, शिरोडा, मुरगाव, दाबोळी, नुवे, फातोर्डा, बाणावली, केपे, कुंकळ्‌ळी व सावर्डे.
* दुसरी फेरी : फोंडा, मडकई, वास्को, कुठ्ठाळी, कुडतरी, मडगाव, नावेली, वेळ्‌ळी, कुडचडे व सांगे.
* तिसरी फेरी : काणकोण

भाजप व कॉंग्रेसचा बहुमताचा दावा

>> उमेदवारांच्या बैठकीत घेतला आढावा

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना काल सत्ताधारी भाजप तसेच प्रदेश कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक बोलावून निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला.
कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी आपल्या पक्षाला किमान २२ ते २५ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीत निवडणुकीसाठी आलेल्या खर्चावरही चर्चा करण्यात आली. टपाली मतदानाच्याबाबतीत निर्माण झालेला गोंधळ पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयोग तसेच स्थानिक मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसमोर ठेवला आहे. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाचा असल्याचे फालेरो यांनी सांगितले.
उमेदवारांकडून घेतलेल्या निवडणूक आढाव्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे ११ रोजीच्या निवडणूक निकालानंतर राज्यात घडणार्‍या राजकीय घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष फालेरो व पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून आहेत. असे असले तरी अकरा रोजी दुपारपर्यंत वरील संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांचे भवितव्य स्पष्ट होईल.
दरम्यान, भाजपनेही काल काही उमेदवार, ज्येष्ठ कार्यकर्ते यांना बोलावून निवडणुकीचा पुन्हा एकदा आढावा घेतला. त्यांनी पूर्वीपासूनच आपल्या पक्षाला २६ जागा मिळतील असा दावा केला आहे. परंतु पक्षाच्या वरिष्ठ बलाढ्य नेत्याने गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष उमेदवारांना सरकार स्थापनेसाठी गळ घातली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपचे