विधानसभा अधिवेशन आजपासून

0
80

आज सोमवार दि. २५ रोजी सकाळी ११.३० वाजता गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अपक्ष आमदारांनी अनेक प्रश्‍नावर सरकारला धारेवर धरण्याचे ठरविले आहे. कॉंग्रेसनेही सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर कॅग अहवाल व आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. हे दोन्ही महत्त्वपूर्ण अहवाल उन्हाळी अधिवेशनात मांडण्याची गरज होती. मात्र, ते मांडण्यात आले नव्हते. आमदारांचे सुमारे २००० हजार तारांकीत व अतारांकीत प्रश्‍न सभापतींच्या कार्यालयात पोचले असल्याचे विधानसभा कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.
बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंबंधीच्या विधेयकाबरोबर अन्य एक विधेयक विधानसभेत सादर केले जाईल. सध्याचे पावसाळी अधिवेशन हे या सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असल्याची शक्यता सर्वच राजकीय पक्ष व्यक्त करीत आहेत. शिक्षण माध्यमाच्या प्रश्‍नावरही हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.