विद्यालयांत विद्यार्थ्यांना दुचाकी आणण्यास मनाइ

0
165

शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना विद्यालयात दुचाकी वाहन आणण्यास मज्जाव केला आहे. यासंबंधीचे परिपत्रक जारी शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर यांनी जारी केले आहे.
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व्यवस्थापनाने शालेय मुलांकडून दुचाकी वाहन विद्यालयात आणण्याच्या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची सूचना केली आहे. शालेय मुलांकडून बेशिस्तपणे दुचाक्या चालवल्या जातात. तसेच, वाहतूक नियमांचे पालन होत नाही. पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मुलांकडून दुचाकी वाहन चालविण्यात येत असलेला मुद्दा उपस्थित करून मुलांना शाळेत येताना दुचाकी देऊ नये, अशी सूचना पालकांना करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.