विद्यार्थिनींचा विनयभंग; शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

0
15

शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. म्हापसा पोलिसांनी उत्तर गोव्यातील एका उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकावर पोक्सो कायदा आणि बाल कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर गोव्यातील एका उच्च माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाकडून याविषयी तक्रार आली होती. एक शिक्षक विद्यार्थिनींकडून टक लावून पाहतो, तसेच त्यांच्याकडे मोबाईल क्रमांकाची विचारणा करतो, तसेच विद्यार्थिनींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने स्पर्श व हावभाव करतो, असे तक्रारीत म्हटले होते, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर कलम 509, 354-ए, 354-डी, गोवा बाल अधिनियम कलम 8 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कलम 8, 12 नुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.