विजेत्यांना प्रत्येकी १ लाख

0
93

काकामिगाहारा येथे झालेली महिला आशिया चषक स्पर्धा विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला लाख रुपये देण्याची घोषणा काल सोमवारी हॉकी इंडियाने केले. भारताने रविवारी चीनचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ असा पराभव करत १३ वर्षांनी सदर स्पर्धा जिंकत पुढील वर्षी होणार्‍या विश्‍वचषकासाठी पात्रता मिळविली होती. १८ सदस्यीय संघातील प्रत्येकाला १ लाख, प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनादेखील १ लाख तर साहाय्यक पथकातील प्रत्येकाला ५० हजार रुपये देण्याची घोषणा हॉकी इंडियाने केली. संपूर्ण स्पर्धेत भारताने २८ गोलांची बरसात करताना केवळ ५ गोल स्वीकारले.