विकासाच्या मुद्यावरून राजीनामा : शिरोडकर

0
107

कॉंग्रेस पक्षाचे आणखीन २ ते ३ आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा सुभाष शिरोडकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवी दिल्ली येथे केला. आणखीन आमदार आत्ताच नाही, तर पुढील काळात भाजपमध्ये प्रवेश करतील असे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील विकासाच्या मुद्यावरून राजीनामा दिला. अन्य काही कारण नाही, असे स्पष्टीकरण शिरोडकर यांनी पत्रकाराशी बोलताना केले.