विंडीजचा आश्‍वासक प्रारंभ

0
91
West Indies cricketer Roston Chase plays a shot during the first day's play of the second Test cricket match between India and West Indies at the Rajiv Gandhi International Cricket Stadium in Hyderabad on October 12, 2018. (Photo by NOAH SEELAM / AFP) / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

हैदराबाद
भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर पाहुण्या वेस्ट इंडीजने ७ बाद २९५ अशी मजल मारली आहे. अष्टपैलू रॉस्टन चेजचे नाबाद अर्धशतक तसेच शेन डावरिच व कर्णधार जेसन होल्डरच्या उपयुक्त धावांमुळे विंडीजला सन्मानजनक स्थिती गाठणे शक्य झाले आहे.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत खेळलेल्या शर्मेन लुईस व किमो पॉल यांना दुसर्‍या कसोटीसाठी बाहेर बसविण्यात आले. त्यांच्या जागी नियमित कर्णधार जेसन होल्डर व डावखुरा फिरकीपटू जोमेल वार्रिकन यांची निवड करण्यात आली. भारताने आश्‍चर्यकारक निर्णय घेताना सलग सहा कसोटी सामने खेळलेल्या मोहम्मद शमीला विश्रांती देत शार्दुल ठाकूरला कसोटी पदार्पणाची संधी दिली. ब्रेथवेट व पॉवेल यांनी विंडीजच्या डावाची सुरुवात केली. अश्‍विनला आक्रमक फटका खेळण्याच्या नादात स्थिरावलेल्या पॉवेलने आपली विकेट फेकत भारताला पहिले यश मिळवून दिले. ब्रेथवेट दुसर्‍या गड्याच्या रुपात परतला. विंडीजचा संघ पहिल्या सत्रात केवळ दोन गडी गमावून जेवणाच्या वेळेपर्यंत जाईल असे वाटत असताना पहिले सत्र संपण्याच्या ठोक्याला शेय होपला उमेशने पायचीत केले. दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला हेटमायर याला कुलदीपचा चेंडू पॅडने खेळण्याचा निर्णय नडला. केवळ १२ धावा करून तो माघारी परतला. पहिल्या कसोटीत बेजबाबदार फटका खेळून बाद झालेल्या सुनील अंबरिसने काही चांगले फटके खेळले. परंतु, बहुतांशी चेंडू लेगसाईडला खेळण्याची त्याची रणनीती त्याच्या अंगलट आली. यावेळी विंडीजची ५ बाद ११३ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. रॉस्टन चेज व डावरिच (३०) यांनी सहाव्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी करताना भारताचे वर्चस्व काहीअंशी झुगारले. संघात परतलेल्या होल्डरने यानंतर भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करताना सातव्या यष्टीसाठी १०४ धावा जोडल्या.
धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव ः क्रेग ब्रेथवेट पायचीत गो. कुलदीप १४, कायरन पॉवेल झे. जडेजा गो. अश्‍विन २२, शेय होप पायचीत गो. उमेश ३६, शिमरॉन हेटमायर पायचीत गो. कुलदीप १२, सुनील अंबरिस झे. जडेजा गो. कुलदीप १८, रॉस्टन चेज नाबाद ९८, शेन डावरिच पायचीत गो. उमेश ३०, जेसन होल्डर झे. पंत गो. उमेश ५२, देवेंद्र बिशू नाबाद २, अवांतर ११, एकूण ९५ षटकांत ७ बाद २९५, गोलंदाजी ः उमेश यादव २३-२-८३-३, शार्दुल ठाकूर १.४-०-९-०, रविचंद्रन अश्‍विन २४.२-७-४९-१, कुलदीप यादव २६-२-७४-३, रवींद्र जडेजा २०-२-६९-०