वाळू व गौण खनिजांचा सरकार करणार लिलाव

0
21

खाण आणि भूविज्ञान खात्याकडून सुमारे 63.35 लाख रुपयांच्या वाळू आणि गौण खनिजांचा लिलाव करण्यात येणार आहे. खाण खात्याकडून धारबांदोडा तालुक्यातील बरकटे, कुळे येथील सर्वे क्रमांक 33/1 व 34/1 मध्ये गौण खनिजाचा लिलाव केला जाणार आहे. नदीतील खडे, गारगोटी, खडी इत्यादी गौण खनिजे आणि वाळू मिळून 63.35 लाख रुपयांच्या लिलावासाठी निविदा मागवल्या आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या गौण खनिजांमध्ये 7449 मीटर नदीतील दगड, 52,14,300 रुपये किमतीची खडी आणि 13,21,200 रुपये किमतीची अंदाजे 1,101 मीटर 3 वाळू यांचा समावेश आहे.