Home बातम्या वारखंड येथील अपघातात १ जखमी

वारखंड येथील अपघातात १ जखमी

0

पोरस्कडे-वारखंड या राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल व स्वीफ्ट कार यांच्यात अपघात होऊन सुभाष सावंत (वारखंड) जखमी झाले, त्यांना म्हापसा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेले, त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे पेडणे पोलिसांनी सांगितले. सुभाष सावंत हे वारखंड येथून आपली मोटरसायकल जीए ०३ ए ०६२७ या वाहनाने पेडण्याच्या बाजूने येत होते.

त्याचवेळी पेडणे मार्गे बांदा स्वीफ्ट कार क्र. जीए ०३ डी ६३७९ हे वाहन जात असता अपघात होऊन मोटरसायकल चालक सुभाष सावंत जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना म्हापसा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गावकर पुढील तपास करीत आहेत.