वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत शाळा, महाविद्यालये बंद

0
25

मागील काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील राज्य सरकारने पुढील आदेश देईपर्यंत विद्यालये आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच सरकारी विभागात १०० टक्के वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजधानीत येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीत अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व प्रकारच्या ट्रकच्या प्रवेशांवरही बंदी घालण्यात आली आहे.

आज गुरूवारपासून दिल्लीत १००० खालगी बसेस भाड्याने घेतल्या जाणार असल्याची माहिती मंत्री गोपाल राय यांनी दिली.

सध्या प्रदूषण कमी करण्यासाठी राजधानीतील १०-१५ वर्षे जुन्या वाहनांची यादी दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आली असून, वाहनांच्या प्रदूषण प्रमाणपत्राची कसून चौकशी केली जाईल.