लोबो-अमित शहा यांची दिल्लीत बैठक

0
45

भाजपसाठी उपद्रवी बनलेले बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांची भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांच्याशी भेट घडवून आणली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवण्यासाठी आपण नवी दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी आपणाबरोबर मंत्री मायकल लोबो हेही उपस्थित होते असे या बैठकीत फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाने दिल्लीत मला चर्चेसाठी बोलावून घेतले होते.

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली. ही बैठक पक्ष पातळीवर होती. इतर आमदारांना मंत्र्यांनाही दिल्लीत बैठकीस बोलावण्यात येईल असे मंत्री लोबो यांनी दिल्लीहून दाबोळी विमानतळावर आल्यानंतर सांगितले.

मंत्री मायकल लोबो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत गोवा भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

पत्नी शिवोलीतून लढणार
यावेळी लोबो यांनी, तुमची पत्नी निवडणूक लढविणार का? असा प्रश्न केला असता माझी पत्नी गेली पंधरा वर्षे राजकारणात असून दहा वर्षे सातत्याने सरपंच होती. आता शिवोली मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.