कोरोनाने सप्टेंबरमध्ये ४५ मृत्यू

0
24

>> चोवीस तासांत दोन मृत्यूंसह ११३ बाधित

सप्टेंबर महिन्यात राज्यात कोविडमुळे एकूण ४५ जणांचे निधन झाले. तर कोरोनाचा संसर्ग झालेले २४७६ नवे रुग्ण राज्यभरात सापडले. दरम्यान गेल्या १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ६९९ एवढी खाली आली होती. ती वाढून आता पुन्हा ८५६ वर आली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात एका दिवसात सर्वाधिक पाच मृत्यू होण्याची घटना दोनदा घडली. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साधारण ९७.६५ टक्के राहिले.

दरम्यान राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ११३ रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८५६ झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३१४ एवढी आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ५१३५ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ८ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २४ एवढी आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ८९ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७२,२६१ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७६,४३१ एवढी झाली आहे.