गोव्यात कृषी विद्यापीठ सुरू करण्याचा केंद्राचा विचार

0
32

>> मंत्री करंदलाजे यांची माहिती

केंद्र सरकारचा गोव्यात कृषी विद्यापीठ सुरू कऱण्याचा विचार आहे अशी माहिती काल केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. अशा प्रकारचे विद्यापीठ राज्यात हवे आहे आणि ते उभारण्यासाठी केंद्र सरकार गोव्याला मदत कऱणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गोव्यात कृषी व फलोत्पादन महाविद्यालय उभे कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गोव्याला मदत करणार असल्याचे मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले. गोव्यातील एक प्रागतिक शेतकरी असलेल्या दर्शना पेडणेकर यांचा मंत्री करंदलाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आधुनिक पद्धतीने शेती करून शेती फायदेशीर व किफायतशीर बनवल्याबद्दल यावेळी शोभा करंदलाजे यांनी दर्शना पेडणेकर यांचे कोतुक केले.