रिक्त असलेले लोकायुक्त पद लवकरच भरण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्याचे लोकायुक्त असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निवृत्त) अंबादास जोशी यांचा कार्यकाळ डिसेंबर 2024 रोजी संपल्यापासून वरील पद रिक्तच आहे. गोवा सरकारला वरील पदासाठी आतापर्यंत तीन नावे आलेली असून. त्यात गोवा, पश्चिम बंगाल व आंध्रप्रदेश येथील प्रत्येकी एका निवृत्त न्यायाधीशाचा समावेश आहे. या पदासाठी आणखी नावांची शिफारस करावी, असे गोवा सरकारने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे.