लोकांच्या हितासाठीच निर्णय : सोपटे

0
232

पेडणे (न. प्र.)
आपण निर्णय घेण्यापूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच मतदारांशी चर्चा केली होती. आपला निर्णय त्यांना कळवला तेव्हा कार्यकर्त्यांनी स्वागत केल्याचे सांगून आपण मतदारसंघ आणि लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे, असे कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विकास आणि बेरोजगारी हे मोठे प्रश्‍न असून विरोधी पक्षात राहूनही विकासकामांना चालना देण्यास सरकारने प्राधान्य दिले. मात्र, सत्ता असल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार नाही. सरकारी नोकर्‍यांसाठी अनेक सुशिक्षित मतदार येतात. त्यांना सरकारी नोकर्‍या कुठून देणार असा सवाल करून त्यांच्यासाठी आपल्याला सरकारच्या बाजूने जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. आपण विकासाला आणि सरकारी नोकर्‍या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.