लोकप्रतिनिधींची माहिती द्या : लोकायुक्त

0
87

लोकायुक्तांनी पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य आणि नगरसेवकांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना पंचायत संचालक तसेच नगरपालिका संचालकांना केली आहे.

लोकायुक्तांकडे राज्यातील पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवकांच्या मालमत्ता प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर एका महिन्यात पंच सदस्य, नगरसेवकांची माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. लोकायुक्तांनी आमदारांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत उद्या संपत आहे.