लुईझिन फालेरोंकडून उमेदवारी अर्ज दाखल

0
23

तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काल राज्यसभेसाठी पश्‍चिम बंगालमधून तृणमूलच्यावतीने उमेदवारी अर्ज भरला.

नावेली मतदारसंघातून कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेशावेळी फालेरो यांना राज्यसभा उमेदवारीचे आश्‍वासन पक्षाने दिले होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आपण नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात का असे फालेरो यांना विचारले असता त्याचा निर्णय आपण योग्य वेळी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.