लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

0
100

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे यापुढे वार्षिक ३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेमध्ये १८ ते ४५ वयोगटातील मुलीला १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते. गतवर्षी या योजनेत दुरुस्ती करून उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्यात आली होती. या संबंधीची सूचना महिला व बाल कल्याण खात्याने जारी केला आहे. या योजनेखाली अविवाहित मुलीला एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जात आहे. महिला व बालकल्याण खाते आणि अर्जदार मुलीच्या नावावर कायम ठेवीच्या स्वरूपात ही रक्कम ठेवली जाते.