लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच पर्यटन सुरू ः आजगावकर

0
110

राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या पर्यटकांना येण्यास मान्यता देण्याची गरज आहे, असे मत पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी काल व्यक्त केले.
राज्यातील कोरोना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. लसीकरणाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.

कोरोना महामारीबाबत गाफील राहणे योग्य नाही. राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर पर्यटन पुन्हा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या पर्यटकांना प्रवेश दिला पाहिजे, असे मत पर्यटनमंत्री आजगावकर यांनी व्यक्त केले.