लईराईचा आज जत्रौत्सव

0
115

जत्रांची जत्रा असलेल्या शिरगावच्या देवी लईराईचा जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून धगधगत्या अग्नीकुंडातून अग्निदिव्याची अनुभूती घेण्यासाठी हजारो व्रतस्थ धोंड सज्ज झाले आहेत. गावाला मांगल्याचा पावित्र्याचा साज चढलेला असून गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व इतर भागातून लाखो भाविकांची पावले आज शिरगावकडे वळणार आहेत.

काल सायंकाळी होमकुंड साकारण्यात आले असून अग्निदिव्य अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे. श्री लईराई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्याने रात्रीच्या वेळी नक्षत्रांप्रमाणे हे मंदिर भासत आहे. शिरगावात प्रत्येक घरात जय्यत तयारी झालेली असून मोठ्या प्रमाणात नातेवाईक व मित्रपरिवार दाखल होणार आहेत. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात चार दिवस कौलोत्सव होईल. प्रशासनाने सर्व सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था चोख व्हावी यासाठी कंबर कसली आहे. सकाळी व्रतस्थ धोंड पवित्र तळीत स्नान करून देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी पुन्हा जत्रोत्सवासाठी सज्ज होतील. रात्री धोंडगण अग्निदिव्य साकारतील.
ङ्गिरत्या शौचालयांची सुविधा
दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी २० ङ्गिरत्या शौचालयांची सोय या जत्रोत्सवात केली आहे. जत्रेला येणार्‍या महिलावर्गाची त्यामुळे सोय होणार आहे. विविध २० जागी ही व्यवस्था करण्यात आली आहे.