लंकेचा मालिका विजय

0
116

>> बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना ७ गडी राखून जिंकला

यजमान श्रीलंकेने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा ७ गडी व ३२ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशचा डाव ८ बाद २३८ धावांत रोखल्यानंतर लंकेने विजयी लक्ष्य ४.४ षटकांत गाठले. आपले दुसरे एकदिवसीय अर्धशतक ठोकत ७५ चेंडूंत ८२ धावा केेलेला अविष्का फर्नांडो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतील तिसरा सामना ३१ जुलै रोजी खेळविला जाणार आहे.

सहा हजारी रहीम
बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीम याने काल रविवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. यासाठी त्याला २०१ डाव लागले. श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान, विश्‍वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा, माहेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, पाकिस्तानचा युनिस खान, शोएब मलिक, न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्कलम भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ व ऍलन बॉर्डर यांच्यापेक्षा कमी डावांत रहीमने सहा हजार धावा पूर्ण केल्या.

अकिलाचे बळींचे अर्धशतक
श्रीलंकेचा ऑफस्पिन गोलंदाज अकिला धनंजया याने काल बांगलादेशविरुद्ध दोन बळी घेत बळींचे अर्धशतक पूर्ण केले. ३५ सामन्यांत २९.२४च्या सरासरीने अकिलाच्या नावावर ५० बळींची नोंद झाली आहे. श्रीलंकेकडून ५० किंवा जास्त बळी घेणारा तो २८वा गोलंदाज ठरला.

धावफलक
बांगलादेश ः तमिम इक्बाल त्रि. गो. उदाना १९, सौम्य सरकार पायचीत गो. प्रदीप ११, मोहम्मद मिथुन झे. मेंडीस गो. धनंजया १२, मुश्फिकुर रहीम नाबाद ९८, महमुदुल्ला त्रि. गो. धनंजया ६, सब्बीर रहमान धावबाद ११, मोसद्देक हुसेन झे. परेरा गो. उदाना १३, मेहदी हसन मिराझ झे. करुणारत्ने गो. प्रदीप ४३, ताईजुल इस्लाम धावबाद ३, मुस्तफिझुर रहमान नाबाद २, अवांतर २०, एकूण ५० षटकांत ८ बाद २३८
गोलंदाजी ः धनंजय डीसिल्वा १०-०-३९-०, नुवान प्रदीप १०-०-५३-२, इसुरु उदाना १०-०-५८-२, लाहिरु कुमारा १०-०-४२-०, अकिला धनंजया १०-०-३९-२
श्रीलंका ः अविष्का फर्नांडो झे. तमिम गो. मुस्तफिझुर ८२, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. मिराझ १५, कुशल परेरा झे. सरकार गो. मुस्तफिझुर ३०, कुशल मेंडीस नाबाद ४१, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ५२, अवांतर २२, एकूण ४४.४ षटकांत ३ बाद २४२
गोलंदाजी ः मेहदी हसन मिराझ १०-०-५१-१, शफिउल इस्लाम ५-०-२९-०, ताईजुल इस्लाम १०-२-३५-०, मुस्तफिझुर रहमान ८-०-५०-२, मोसद्देक हुसेन ७-०-३२-०, सब्बीर रहमान २.४-०-२०-०, सौम्य सरकार २-०-१६-०