रिया चक्रवर्तीला अखेर २८ दिवसांनी जामीन

0
253

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पोलीस कोठडीत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने काल अखेर सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या एक महिन्यापासून रिया भायखळा येथील तुरुंगात होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज रियाच्या अर्जावर सुनावणी झाली. एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर जामीन मंजूर केला. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करून सहा महिने विशिष्ट तारखांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियासोबत आरोपी दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.