रित्विज परबला अजिंक्यपद गोवा ऑनलाईन चेस लीग

0
127

रित्विज परबने नवव्या फेरीअंती ८ गुणांसह पेडणे तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित १०व्या गोवा ऑनलाईन चेस लीगचे अजिंक्यपद प्राप्त केले. फिडे मास्टर नितिश बेलुरकरनेही ९ फेर्‍यांमधून ८ गुण प्राप्त केले होते. परंतु टायब्रेकवर त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पार्थ साळवीने ७ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले.

मंदार लाड, तन्वी हडकोणकर, आयुष शिरोडकर, रुबेन कुलासो, देवश नाईक, शेन ब्रागांझा आणि वसंत नाईक यांनी अनुक्रमे ४ ते १०वे स्थान मिळविले. तर साईराज वेर्णेकर, जॉय काकोडकर, स्वेरा ब्रागांझा, यश उपाध्ये आणि विवान बाळ्ळीकर यांनी ११ ते १५वे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट महिला ः स्नेहल नाईक, अंडर-७ मुली व मुलगे – दिया सावळ व सरस पोवार, अंडर-९ मुली व मुलगे – राशेल परेरा व इनाथ वाझ, अंडर-११ मुली व मुलगे – आर्य दुबळे व एड्रिक वाझ, अंडर-१३ मुली व मुलगे – सानी गावस व श्‍लोक धुळापकर, १५००खालील रेटिेेंग – अविनाश बोरकर आणि १३००खालील रेटिेेंग – धीरज देसाई यांना बक्षिसे प्राप्त झाली.
या अजिंक्यपदामुळे रित्विजने गोवा चेस लीग स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या शर्यतीतील आपले स्थान कायम राखले आहे. लीगमधील अजून दोन स्पर्धा बाकी आहेत. १०व्या स्पर्धेनंतर नितीश ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदकासह आघाडीवर आहे. तर रित्विज परब ४ सुवर्ण व २ रौप्यपदकांसह दुसर्‍या स्थानी आहे तर विवान बाळ्ळीकर १ सुवर्णपदकासह तिसर्‍या स्थानी आहे. लीगमधील आता सांगे तालुका आणि धारबांदोडा तालुक्यातील स्पर्धा बाकी आहेत. या स्पर्धा निर्णायक ठरणार आहेत.

११वी गोवा ऑनलाईन चेस लीग सांगे तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे येत्या रविवार २५ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा.पासून खेळविली जाणार आहे.