रिटा बॉईज नेरुल संघ विजेता

0
105

मांद्रे येथील युनायटेड क्रीडा व सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या उत्तर गोवा पातळीवरील सेव्हन अ साईड ङ्गुटबॉल स्पर्धेत रिटा बॉईज नेरुल संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रुपये १०,००० व चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे उपविजेतेपद पर्पझ बॉईज मांद्रे संघाला प्राप्त झाले. त्यांनी रोख रुपये ५,००० व चषकाची कमाई केली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून शशांक आश्वेकर (पर्पेझ बॉईज मांद्रे संघ) उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून शुभम (रिटा बॉईज) यांची निवड करण्यात आली. मांद्रे पंचायत मैदानावर झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ संघानी भाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मांद्रे पंचायतीचे पंच सदस्य राघोबा गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत पंच सदस्य प्रदीप हडङ्गडकर, उद्योजक लुईस फर्नांडिस, रामा गावडे, पांडुरंग गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग गावडे यांनी केले व आभार वासू गावडे यांनी मानले.