राहुल गांधींची चौकशी कामकाजाचा भाग : जेटली

0
88

वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल माहिती गोळा करण्याचे काम दिल्ली पोलिसांकडून पूर्वीपासून गेले जात असून केंद्र सरकारने कधीही कोणाच्या घरी जाऊन हेरगिरी केली नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केले. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकशीचा मुद्दा कॉंग्रेसने उपस्थित केल्यानंतर जेटली यांनी हे स्पष्टीकरण केल्याने विरोधकांच्या आरोपातील हवाच निघाली आहे. राहुल गांधी यांची चौकशी केलेल्या दिवशी पोलिसांनी नरेश आगरवाल यांच्याही निवासस्थानी जाऊन माहिती घेतल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी संसदेत बोलताना दिली.

यूपीए सरकारच्या कार्यकाळात ५६२ महनीय व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आल्याचे जेटली सभागृहात माहिती देताना म्हणाले.