राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे मुखर्जींकडून संकेत

0
92

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपण दुसर्‍यांदा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याबाबतचे संकेत काल एका समारंभावेळी बोलताना दिले.
यावेळी मुखर्जी यांनी सांगितले की आपण आपल्याबरोबर काम करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांच्या खात्यांमध्ये पाठवित आहे. ‘मला येथून जाण्यास दोन महिने बाकी आहेत. २५ जुलैला नवे राष्ट्रपती सूत्रे घेतील’ असे ते म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी मुखर्जी यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपतीपदी निवडून आणण्यास मान्यता असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र सत्ताधारी गटाने अद्याप या संदर्भात कोणतीही टिप्पणी केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर मुखर्जी यांची प्रतिक्रिया सूचक ठरली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जुलैमध्ये होणार आहे.