रायबंदरच्या उंची बॉईजला जेतेपद

0
84

रायबंदरच्या उंची बॉईजने अंतिम सामन्यात यजमान एफसी दिवाडी संघाचा टायब्रेकरवर १-० असा निसटता पराभव करीत २र्‍या अखिल गोवा ५ खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
सलग दोन रविवारी खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ६४ संघांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उंची बॉईजने पूर्ण वेळेत शानदार खेळ केला. परंतु प्रतिस्पर्धी यजमान एफसी दिवाडी संघाने त्यांच्या तोडीस तोड खेळताना गोल करण्याची कोणतीही संधी न दिल्याने गोलफलक कोराच राहिला. त्यामुळे निकालासाठी रेफ्रीने टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात उंची बाईजने १-० अशी बाजी मारली.

विजेत्या उंची बॉईजला रु. १०,००० व चषक तर उपविजेत्या एसी दिवाडी संघाला रु. ५,००० व चषकावर समाधान मानावे लागले.