बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री, दलित नेते रामविलास पासवान (७४) यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि. १० रोजी पाटण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. पासवान यांचे पार्थिव शनिवारी दुपारी ३ वाजता पाटणा विमानतळावर दाखल होईल. तिथून त्यांचे पार्थिव पक्ष कार्यालयात दाखल होईल. शनिवारी सकाळी पाटणा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे. तत्पूर्वी राजधानी दिल्लीमध्ये रामविलास पासवान यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानी १२, जनपथ येथे ठेवण्यात येणार आहे.