रापणकार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0
94

संघटना म्हणते…

  • सात दिवसात एलईडी दिव्यांवर कारवाईची मागणी
  • मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन नाही
  • मुख्यमंत्री, मच्छीमारी मंत्री यांच्याकडून टोलवाटोलवी

राज्यातील काही मच्छीमारी ट्रॉलरवाल्यांनी आपल्या ट्रॉलर्सवर एलईडी दिवे बसविल्याने या दिव्यांमुळे मत्स्य धनाची नासाडी होत असून हा प्रकार असाच चालू राहिल्यास राज्यात मत्स्यदुष्काळ पडण्याची भीती रापणकार संघटनेने काल पत्रकार परिषदेत व्यक्त केली. काकरा येथील शांतादुर्गा मासळी संघटनेचे अध्यक्ष व रापणकार संघटनेचे एक पदाधिकारी संजय पेरेरा या पत्रकार परिषदेत म्हणाले की, एलईडी दिवे बसवलेल्या ट्रॉलर्सवर सरकारने सात दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर रापणकार संघटना रस्त्यावर येईल व नंतर जे काही होईल त्याला सरकारच जबाबदार राहील.
मुख्यंत्र्यांकडून आश्‍वासन नाही
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची काल रापणकार संघटनेने भेट घेऊन त्यांना एलईडी बसवलेल्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्याची त्यांच्याकडे मागणी केली. मात्र, पार्सेकर यांनी आमचे जे काही म्हणणे आहे ते मच्छीमार मंत्री आवेर्तान ङ्गुर्तादो यांच्याकडे मांडण्याची सूचना केल्याचे पेरेरा म्हणाले. मच्छीमारी मंत्री ङ्गुर्तादो यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गार्‍हाणे मांडले असता आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय ते कळवतो असे त्यांनी सांगितल्याचे पेरेरा म्हणाले.
आम्ही ङ्गुर्तादो यांना सात दिवसांची मुदत दिलेली असून सात दिवसांच्या आत मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांना कळवले असल्याचे पेरेरा म्हणाले.
ज्या ट्रॉलरवाल्यांनी आपल्या ट्रॉलर्सवर एलइडी दिवे बसवले आहेत ते ट्रॉलरवाले मच्छीमारीसाठी जातात तेव्हा एलईडी दिव्याचा प्रखर प्रकाशझोत ३५ मीटरपर्यंत खोल पाण्यात सोडतात. या प्रखर प्रकाश झोतामुळे मोठ्या मासळी बरोबरच मासळीच्या पिल्लांचीही स्थिती आंधळ्यासारखी होते व सगळीच मासळी जाळ्यात सापडते. अशा प्रकारे मासळीची पिल्ले मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडल्यास भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती असल्याचे पेरेरा म्हणाले.