श्रीलंकेमध्ये काल नव्या राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. २२५ सदस्य असणार्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यांना १३४ मते मिळाली आहेत.
गोटाबाया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. रत्यानंतर आता गोटाबाया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.