राज्यात 24 तासांत नवे 52 कोरोनाबाधित

0
6

राज्यात चोवीस तासांत 631 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात नवीन 52 कोरोनाबाधित आढळून आले असून, 3 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 8.2 टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळातून 4 रुग्णांना घरी पाठविण्यात आले असून, 30 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 279 एवढी झाली आहे.