राज्यात २४ तासां नवे १५ कोरोनाबाधित

0
17

राज्यात चोवीस तासांत नवीन १५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९१ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ७१२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १५ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाण २.१० टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी ८ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४० टक्के एवढे आहे.