राज्यात पोलिसांना सतर्कतेचे आदेश

0
73

बंगळूरू येथे रविवारी झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे इस्पितळांनाही रुग्णवाहिका तयार ठेवण्यास सांगितले आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी काल दिली. वागातोर येथे चालू असलेल्या सनबर्न व सुपरसॉनिक महोत्सवाच्या स्थळी साध्या गणवेशातील पोलीस तैनात केले आहेत. गेल्या काही दिवसात तेथे अमली पदार्थांचा वापर केल्याचे आढळून आलेले नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. जुवारी पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून २० पोलीस तैनात केल्याची माहिती गर्ग यांनी दिली.