राज्यात चोवीस तासांत नवे ६ कोरोनाबाधित

0
18

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र, आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या ४४ एवढी आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ४६९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी ५ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४२ टक्के एवढे आहे.