राज्यात गुरुवार दि. 16 एप्रिलपासून डिजिटल जनगणनेच्या प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ होणार आहे. राज्यात 16 एप्रिल ते 15 मेपर्यंत घरोघरी फिरून जनगणनेचे काम केले जाणार आहे. या जनगणनेसाठी नियुक्त केलेले सुमारे 3 हजार सरकारी कर्मचारी घरोघरी भेटी देऊन जनगणनेचे काम करणार आहेत. या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वेच्छा माहिती डिजिटल माध्यमातून देण्याची प्रक्रिया 1 ते 15 एप्रिलपर्यंत खुली ठेवण्यात आली होती. या काळात सुमारे 12 हजार नागरिकांनी स्वेच्छा माहितीची नोंद केली.