Home बातम्या राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांचेमेपर्यंत दुरूस्तीकाम : डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांचेमेपर्यंत दुरूस्तीकाम : डॉ. प्रमोद सावंत

0

मे महिन्याच्या शेवटापर्यंत राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांचे दुरूस्तीकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. काल प्रश्नोत्तरच्या तासाला बोलताना त्यांनी, राज्यातील 568 शाळा इमारतींची सुरक्षा तपासणी पुढील महिन्याभरात होणार आहे. येत्या मे महिन्यांच्या शेवटपर्यंत राज्यातील सर्व शाळा इमारतींची आवश्यक ती दुरूस्ती करण्याचे काम पूर्ण केले जाईल. तसेच या शाळांसाठी आवश्यक ती सगळी साधनसुविधाही उभारण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार व्हेंझी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा आदींनी सरकार गरज नसताना एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करून उन्हाळ्याच्या झळांचा सामना करण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आणत असल्याचा आरोप केला. एप्रिल महिन्याऐवजी पूर्वीप्रमाणे जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तरी वार्षिक शैक्षणिक दिवस व तास पूर्ण करणे शक्य असल्याचे वरील आमदारांनी यावेळी स्पष्ट केले. 120 अध्यापन दिवस पूर्ण करण्याच्या नावाखाली गरज नसताना एप्रिल महिन्यात वर्ग भरवले जात असून त्याची काही एक गरज नाही. त्यामुळे सरकारने शैक्षणिक वर्ष हे पूर्वीप्रमाणेच जून महिन्यातच सुरू करावे, अशी मागणी यावेळी विरोधी आमदारांनी केली.