राज्यातील सक्रिय कोरोन रुग्णसंख्या ५० च्या जवळ

0
26

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ९ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा ५० च्या जवळ येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात ४९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ५४० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ९ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.६६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४२ टक्के एवढे आहे.