राज्यातील चार्टर विमान संख्येत ३५ टक्क्यांनी घट

0
94

यंदाच्या मोसमात चार्टर विमानसेवेत सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकरयांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. रशियात आर्थिक मंदी आल्याने रशियातून गोव्यात पर्यटक येणे बंद झाले आहेत. रशियातून गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून ही यंदा घटल्याने चार्टर विमान सेवेत घट झाल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी राज्यात ११४१ चार्टर विमाने गोव्यात आली. त्यातून गोव्यात आलेल्या पर्यटकांची संख्या अडीच लाख एवढी होती. यंदा मात्र आतापर्यंत राज्यात ८५० एवढीच चार्टर विमाने आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांसाठी एक वाहतूक धोरण तयार करणार असल्याचे यावेळी महामंडळाचे चेअरमन आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.