>> सभापतींची विरोधकांना समज
सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोवा विधानसभेत आपले अभिभाषण केल्यानंतर ते सभागृहातून निघून जाताना काही विरोधी आमदारांनी त्यांना सभागृहात कोळसा नको असे लिहिलेले पोस्टर दाखवत घोषणा देण्याची जी घटना घडली त्याने हक्कभंग झालेला असून यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा काल सभापती राजेश पाटणेकर यांनी विरोधकांना दिला.