आगामी अधिवेशनात सहकार कायद्यात दुरूस्ती ः गावडे

0
78

राज्यातील अर्बन आणि पुरवठा संस्थातील आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच, सहकार कायदा अधिक बळकट करण्यासाठी आगामी अधिवेशनात सहकार कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री गोविद गावडे यांनी काल विधानसभेत दिली.
दक्षिण गोव्यातील व्हिजिनरी पतपुरवठा सोसायटीच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर गैरव्यवहारात गुंतलेल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या व्हिजिनरी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराबाबतच्या लक्षवेधी सूचनेला मंत्री गावडे उत्तर देत होते.
दक्षिण गोव्यातील व्हिजिनरी पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत वर्ष २०१२ पासून आवाज उठवत आहे. या पंतसंस्थेत गैरव्यवहार करणार्‍यांवर त्वरित कारवाई करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी केली.

व्हिजिनरी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. ऑडिटचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर गैरव्यवहाराची सविस्तर माहिती तयार करून पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचे मंत्री गावडे म्हणाले.