राजस्थानातील अपघातात ११ जणांचा मृत्यू; ७ जखमी

0
11

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील गुढागौडजी भागात पिकअपचा भीषण अपघात झाला. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना बीडीके रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्य मार्ग ३७ वरील लीलों ढाणी जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असणारी पिकअप पलटल्याने हा अपघात झाला. या पिकअपमधून प्रवास करणार्‍या ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींपैकी तिघांचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला. जखमी झालेल्या ७ जणांवर उपचार सुरू आहेत. खेतडी येथील बडाऊमधील एक कुटुंब लोहार्गल धाम येथून दर्शन घेऊन माघारी येत होते; मात्र, पिकअपचा वेग अधिक असल्याने गाडी पलटी झाली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.