जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज (दि. 5) राज्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राजभवनातील दरबार सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, समीर जोशी, अंकित यादव आदी मान्यवर उपस्थित असतील. यावेळी समीर जोशी व अंकित यादव यांचे ‘प्लास्टिकला पर्याय आणि कचरा व्यवस्थापन’ या विषयावर एक बीजभाषण होईल. हा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.